शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Agnipath Scheme: "अग्निपथ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी RSS चा छुपा अजेंडा;" मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:28 IST

आता ज्या 10 लाख लोकांची भरती केली जाणार आहे, ते आरएसएसचे कार्यकर्त्येही असू शकतात.

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांत विरोध होत आहे. यातच, अग्निपथ योजना ही लष्करावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचा छुपा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. एवढेच नाही, तर आरएसएसचे कार्यकर्तेच सैन्यदलात अग्निवीर होतील आणि ते बाहेरही हेच काम करतील. त्यांची सेवा संपल्यानंतर, ते आरएसएससाठीच काम करतील, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.

यावेळी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते त्यांची नियुक्ती करणार, की लष्कर? असा सवाल उपस्थित करत कुमारस्वामी म्हणाले,  आता ज्या 10 लाख लोकांची भरती केली जाणार आहे, ते आरएसएसचे कार्यकर्त्येही असू शकतात. ते अडीच लाख कार्यकर्त्यांना लष्करातही भरती करू शकतात. तसेच चार वर्षांनंतर, जे 75 टक्के तरुण बाहेर पडतील, त्यांनाही 11 लाख रुपये दिले जातील. ते संपूर्ण देशभरात पसरतील, हा एक छुपा अजेंडा आहे,” असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामी म्हणाले, 'आरएसएस लष्करावर ताबा मिळविण्याचा विचार करत आहे.' जेव्हा जर्मनीमध्ये हिटलरची राजवट होती, त्याच काळात आरएसएसची स्थापना झाली. यामुळे, आता आरएसएसला देशात नाझी राजवट लागू करण्याचीही इच्छा असू शकते. यासाठीच त्यांनी अग्निपथ योजना सुरू केली आहे.

कुमारस्वामी यांचे वक्तव्य म्हणजे लष्कराचा अपमान -एचडी कुमारस्वानी यांच्या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अशी विधाने करणे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. आता आरएसएस आणि भाजपला सोडून थेट भारतीय सेन्य दलाला टार्गेट केले जात आहे. या देशाचे लष्कर, अशा प्रकारची तडजोड होऊ देईल? हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्यांचा अपमान आहे. कुमारस्वामी यांचे वक्तव्य म्हणजे थेट लष्कराचा अपमान आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हणाले आहे. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाKarnatakकर्नाटक