शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात जाहीर प्रवेश; पक्षाला किती फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:21 IST

Champai Soren News : चंपाई सोरेन यांच्या रुपात भाजपकडे मोठा आदिवासी चेहरा आला आहे.

Champai Soren Join BJP :झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी आज (30 ऑगस्ट) भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र, डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी शुक्रवारीच रामदास सोरेन (Ramdas Soren) यांना राज्य सरकारमध्ये मंत्री केले आहे.

चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशासाठी रांची येथील शाखेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान, निवडणूक सहप्रभारी हिमंता बिस्वा शर्मा, प्रदेशाध्यक्ष बाबू लाल मरांडी आणि झारखंड भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी मंचावर चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेनदेखील उपस्थित होते.

चंपाई सोरेन यांनी का सोडला पक्ष?झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका आर्थिक खटल्यात तुरुंगात जावे लागले होते. यामुळे त्यांनी चंपाई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवले. पण, पाच महिन्यानंतर जामीन मिळताच ते चंपाई यांना बाजुला सारत मुख्यमंत्रिपदावर बसले. या निर्णयामुळे चंपाई सोरेन खूप नाराज होते. 

चंपाई सोरने यांच्यामुळे भाजपचा फायदा?झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी चंपाई सोरेन भाजपसाठी खुप फायद्याचे ठरू शकतात. चंपाई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यासह झारखंड चळवळीचे एक मजबूत नेते आहेत. राज्यातील अनेक विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. यामध्ये कोल्हाण प्रदेश प्रमुख आहे. झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांपैकी 28 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती. 28 जागांपैकी भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभेच्या पाचही जागांवरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच आता चंपाई सोरेन यांच्यासारखे नेते भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. 

टॅग्स :BJPभाजपाJharkhandझारखंड