शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:01 IST

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

delhi floods 2023 : राजधानी दिल्लीवर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला असून सोमवारपासून यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत हातिनीकुंड बॅरेजमधून १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप करत असून दिल्लीतील ओल्या दुष्काळावरून भाजपा आणि आम आदमी पार्टीमध्ये सामना रंगला आहे. भाजपाचे खासदार गौतम गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

दिल्लीत मागील नऊ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे सरकार आहे. याचाच दाखला देत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गंभीरने केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मागील नऊ वर्षात प्रचारावर किती पैसा खर्च केला आणि पायाभूत सुविधांवर किती खर्च झाला हे सांगावे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा आज उघड झाला असून त्यांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही. ते पंतप्रधानांच्या परदेशी दौऱ्यावर बोलतात पण पाणी शहरात का शिरले याबद्दल उघडपणे बोलत नाहीत", अशा शब्दांत गंभीरने केजरीवालांवर टीकास्त्र सोडले. 

पावसाचा हाहाकार उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली