शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 3:20 PM

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांना पत्नी सुदर्शना सिंह यांना दर महिन्याला पोटगी म्हणून ४ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उदयपूर कौटुंबिक न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विक्रमादित्य सिंह हे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. त्यांची पत्नी सुदर्शना सिंह या उदयपूरच्या अमेट येथील रहिवासी आहेत. 

काँग्रेस नेते तथा आमदार आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावर त्यांची पत्नी सुदर्शना सिंह यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. विक्रमादित्य सिंह यांची आई प्रतिभा सिंह आणि बहिणीशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील छळाचा आरोप आहे. विक्रमादित्य यांच्या पत्नी सुदर्शना यांच्या वकिलाने सांगितले की, राजसमंदच्या अमेट घराण्यातील मुलीचा विवाह माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य यांच्याशी ८ मार्च २०१९ रोजी झाला होता. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर सुदर्शना सिंह यांना उदयपूरला पाठवण्यात आले. यावेळी त्यांचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.

विक्रमादित्य सिंह यांना झटकासुदर्शना यांनी उदयपूर न्यायालयात महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण या कायद्याच्या कलम २० अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सुदर्शना यांनी तक्रारीत आरोप केला की, लग्नानंतर त्या शिमला येथे सासरच्या घरी आल्या आणि काही काळानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.

पत्नीचे गंभीर आरोप सुदर्शना यांनी तक्रारीत म्हटले की, ८ मार्च २०१९ रोजी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. राजस्थानमधील कनोटा गावात हिंदू रितीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्या सासरच्या घरी आल्या. तिथे त्यांचा मानसिक छळ झाला. सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच सुदर्शना यांच्या नातेवाईकांना शिमला येथे बोलावले आणि त्यांना जबरदस्तीने उदयपूरला पाठवले. तसेच आपल्या तक्रारीत सुदर्शना यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली. याशिवाय वेगळे राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशmarriageलग्नCourtन्यायालय