शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 16:40 IST

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  

पूर्वाश्रमीचे भाजपा नेते अशी शंकरसिंह वाघेला यांची ओळख होती. त्याअगोदर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात  स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले होते. मात्र, 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी भाजपाशी जवळीक साधली. आता स्वत:चे राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शंकरसिंह वाघेला हे गुजरात राज्यातील राजकारणातील अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, हे निश्चित.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी शंकरसिंह वाघेला यांनी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तसेच भाजपामधूनही ते अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे स्वत:चे आणि मुलाचे राजकीय करिअर वाचविण्यासाठी ते घड्याळाचे टायमिंग साधणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा किती फायदा होणार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पाहता येईल. 

टॅग्स :GujaratगुजरातSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९