शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Gujarat CM: गेहलोतांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू असतानाच BJP च्या माजी मुख्यमंत्र्याचा मोठा खुलासा - 'एका फोनवर...' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 10:53 IST

विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे.

काँग्रेस हायकमांडने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. यामुळे सध्या पक्षात जबरदस्त घमासान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गेहलोत आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. यातच, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी मोठा खुलासा करत, आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगताच पदाचा राजीनामा दिला होता, असे म्हटले आहे.

एका फोनवर विजय रुपाणी यांनी दिला होता राजीनामा -गुजरातचे  माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे. रुपानी यांनी सांगितले, की "एक दिवस आधी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडून मेसेज मिळाला होता. यानंतर त्यांनी 11 सप्टेंबर 2021 ला गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता."

विजय रुपाणी यांना पद सोडताना कारणही सांगितलं नव्हतं - गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, पद सोडताना आपल्याला पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे कारण सांगण्यात आले नव्हते आणि आपणही पक्षाकडे  यासंदर्भात विचारणा केली नव्हती. याचवेळी, पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्याचे सांगत रुपाणी म्हणाले की, पक्षाने आपल्याला ज्या-ज्या वेळी जी-जी जबाबदारी दिली, ती आपण पूर्णपणे पार पाडली आहे.

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाशी होतेय तुलना - विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे. येथे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी गेहलोतांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर घमासान सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने अशोक गेहलोतांना प्रमोशन देऊन पक्षाचे वरिष्ठ पद देण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, असे असतानाही गेहलोतांचे समर्थक आमदार आणि मंत्री आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरात