माजी ‘डीजीपी’ची आत्महत्या

By Admin | Updated: September 18, 2014 02:15 IST2014-09-18T02:15:53+5:302014-09-18T02:15:53+5:30

आसामचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) शंकर बरुआ यांनी बुधवारी आपल्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

Former DGP's suicide | माजी ‘डीजीपी’ची आत्महत्या

माजी ‘डीजीपी’ची आत्महत्या

स्वत:वर गोळीबार : शारदा चिटफंड प्रकरणात आणखी एकाचा बळी
गुवाहाटी : शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी गेल्या महिन्यात ज्याच्या घराची केंद्रीय अन्वेषण विभागाने झडती घेतली ते आसामचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) शंकर बरुआ यांनी बुधवारी आपल्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. 
बरुआ यांना दुपारी 12 वाजता त्वरित नर्सिग होममध्ये आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
बरुआ यांचा मृत्यू झाला, आम्ही चौकशी करत आहोत, सध्या काही सांगता येणो शक्य नाही, चौकशीनंतर सविस्तर काही सांगता येऊ शकते, असे गुवाहाटीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ए. पी. तिवारी म्हणाले.
बरुआ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.  गेल्या आठवडय़ात छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णानलयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना बुधवारी सकाळी सुटी मिळाली होती. 
रुग्णालयातून घरी परत आले आणि अध्र्या तासांनी छतावर गेले. तेथे त्यांनी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. कुटुंबातील लोकांनी त्वरित त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. बरुआ यांनी आपल्याला सुरक्षा प्रदान केली होती आणि याची व्यवस्था लोकप्रिय आसामी गायक व चित्रपटकार सदानंद गोर्गो यांनी या ग्रुपच्या वतीने केली होती, असा आरोप गेल्या वर्षी शारदा मीडिया हाऊसच्या एका कर्मचा:याने केला होता. त्यानंतर या प्रकरणात बरुआ यांचे नाव प्रकाशात आले होते. (वृत्तसंस्था)
 
च्सीबीआयने कोटय़वधी रुपयांच्या या चिटफंड घोटाळाप्रकरणी 28 ऑगस्टला 12 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात बरुआ यांच्या घराचा देखील समावेश होता.
च्शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यामुळे बरुआ यांना नैराश्य आले होते, असे कुटुंबातील सूत्रंनी सांगितले.

 

Web Title: Former DGP's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.