शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"कठोर कायद्याची गरज आहे...", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 19:30 IST

पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे. जादवपूरच्या घटनेनंतर राज्यातील इतर विद्यापीठे आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. जादवपूरच्या घटनेनंतर रवींद्र भारती, प्रेसिडेन्सी, कलकत्ता या विद्यापीठांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. जादवपूरच्या घटनेनंतर इतर विद्यापीठेही त्यांच्या पूर्वीच्या निर्णयांची फेरतपासणी करत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सौरव गांगुली यांनी या दुर्दैवी घटनेवर नाराजी व्यक्त केली.

ही शिकण्याची ठिकाणे आहेत, या संस्थांमध्ये विद्यार्थी शिकायला येतात. कठोर कायद्याची गरज असून यावरच लक्ष असायला हवे, असे गांगुली यांनी सांगितले. मृत्यूच्या घटनेनंतर चांगलेच राजकारण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस सरकारवर आरोप करत भाजपाने सडकून टीका केली.

शुक्रवारी आंदोलन करत असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली असता अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. खरं तर जादवपूर विद्यापीठात ९ ऑगस्ट रोजी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. विरोधक विविध आरोप करत आहेत. मात्र, ममता सरकार आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

दरम्यान, ९ ऑगस्टच्या रात्री स्वप्नदीप हा वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडला असता त्याचा मृत्यू झाला. वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना छतावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. मग जाऊन पाहिले तर स्वप्नदीप रक्ताच्या थारोळ्यात दिसला. १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता स्वप्नदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पडला तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालSaurav Gangulyसौरभ गांगुलीDeathमृत्यूMamata Banerjeeममता बॅनर्जी