माजी नगरसेवक संजय नांदे यांचे निधन फोटो : बजरंग निंबाळकर यांनी पाठविला आहे.
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:00+5:302015-07-15T00:15:00+5:30
धनकवडी : संभाजीनगर येथील माजी नगरसेवक संजय नांदे (वय ४६) यांचे मंगळवारी सकाळी अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

माजी नगरसेवक संजय नांदे यांचे निधन फोटो : बजरंग निंबाळकर यांनी पाठविला आहे.
ध कवडी : संभाजीनगर येथील माजी नगरसेवक संजय नांदे (वय ४६) यांचे मंगळवारी सकाळी अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मित्रांसमवेत नांदे अमरनाथ यात्रेला गेले होते. शनिवारी रात्री मुंबईहून विमानाने ते श्रीनगरला गेले. रात्री तिथे मुक्काम करून रविवारी त्यांनी अमरनाथच्या दिशेने कुच केले. सोमवारी रात्री त्यांनी सोनमर्गजवळील बालताल येथे मुक्काम केला. मंगळवारी सकाळी त्यांच्या सोबतचे काही मित्र घोडयावरून पुढे गेले. रामदास गाडे यांच्यासह नांदे चालत निघाले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास बालताल येथे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगचे रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी श्रीनगरहून विमानाने त्यांचा मृतदेह पुण्यात आणण्यात येणार आहे असे अशी माहिती त्यांच्यासोबत गेलेले मित्र अमित काळे यांनी दिली आहे.