नवी दिल्ली - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची ६१.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने हंगामी टाच आणली आहे. दारू घोटाळ्याशी निगडीत ही कारवाई आहे. बघेल यांचे ५९.९६ कोटींचे ३६४ निवासी प्लॉट आणि शेतजमीन तसेच बँक खात्यातील रकम व मुदतठेवी यांसह १.२४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली.
छत्तीसगडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी कारवाईदारू घोटाळ्यात गुंतलेल्यांना २५०० कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने केला आहे. दारू सिंडिकेटवर नियंत्रण ठेवण्याचे काम चैतन्य बघेल करत होता. अवैध पैसा चैतन्य याने आपल्या रिअल इस्टेट व्यवसायासाठी वापरला. त्याला ईडीने १८ जुलैला अटक केली. याआधी या प्रकरणात अनिल तुतेजा (माजी आयएएस), अरविंद सिंग, त्रिलोक सिंग ढिल्लन, अन्वर ढेबर, अरुण पती त्रिपाठी आणि कावसी लखमा (माजी महसूल मंत्री) यांना ईडीने अटक केली होती.
Web Summary : ED attached ₹61.20 crore of Chaitanya Baghel's assets in a liquor scam case. The assets include residential plots, farmland, bank funds, and fixed deposits. Chaitanya allegedly controlled the liquor syndicate and used illicit funds for real estate. He was arrested in July.
Web Summary : ईडी ने शराब घोटाले के मामले में चैतन्य बघेल की 61.20 करोड़ रुपये की संपत्ति जब्त की। संपत्तियों में आवासीय प्लॉट, कृषि भूमि, बैंक फंड और सावधि जमा शामिल हैं। चैतन्य पर शराब सिंडिकेट को नियंत्रित करने और अवैध धन का इस्तेमाल रियल एस्टेट के लिए करने का आरोप है। जुलाई में हुई गिरफ्तारी।