शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:30 IST

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे.

सिमला : सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.अश्विनी कुमार यांच्या मृत्यूबाबत वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. कुंडू यांनी सांगितले की, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. अश्विनी कुमार हे त्यांच्या खोलीत गेले, आतून दार लावले व नायलॉनच्या दोरीने आत्महत्या केली. या वेळी त्यांचे कुटुंबीय घरातच होते. या घटनेत काही घातपात असण्याची शक्यता कुटुंबीयांना वाटत नाही. गुरुवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.एरव्ही अत्यंत कार्यमग्न असलेले अश्विनीकुमार यांना मागील सहा महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही पोलीस इतर शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत.त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, अश्विनी कुमार हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. घरी परतल्यावर ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते.अरुषी तलवार खून प्रकरण खूप गाजत असताना २००८ मध्ये ते सीबीआयचे संचालक झाले होते. मार्च २०१३ ते जून २०१४ पर्यंत ते नागालँडचे राज्यपाल होते. २०१३मध्ये काही काळासाठी ते मणिपूरचे राज्यपाल होते. ऑगस्ट २००६ पासून जुलै २००८ या कालावधीत ते हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. २ आॅगस्ट २००८ ते ३० नोव्हेंबर २०१० या कालावधीत ते सीबीआयचे संचालक होते. सध्या ते सिमला येथील खाजगी विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते १९७३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. १९८५मध्ये त्यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये (एसपीजी) नेमणूक केली होती. १९८५ ते १९९० पर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले. पीएमओमध्ये सहायक संचालक पदावरही त्यांनी काम केले.

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग