शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कृषी कायदे बळजबरीने लादले; शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 06:57 IST

दिल्लीत बसून शेती करता येत नसल्याचा लगावला टोला

नवी दिल्ली : ‘राज्य सरकारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, त्यांच्याशी सल्लामसलत न करता केंद्राने तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांवर बळजबरीने लादले. शेतकरीवर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. खेडोपाडी तो काबाडकष्ट करून शेती फुलवतो. अशा स्थितीत दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही’, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सुमारे दोन लाख शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारशी आतापर्यंत त्यांच्या चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या परंतु अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी या संपूर्ण आंदोलनाबाबत परखड मते मांडली. पवार पुढे म्हणाले की, ‘यूपीए सरकारच्या कालावधीत कृषिमंत्री असताना मला व तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्यासाठी आम्ही सगळी तयारीही केली. सर्व राज्यांना विश्वासात घेतले. त्यांच्याशी वेळोवेळी प्रदीर्घ चर्चा केली. 

मंत्रिगटाबाबत साशंकता

आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारने जो मंत्रिगट नियुक्त केला आहे त्यावरही पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मंत्रिगटातील सदस्यांना शेतीविषयक सखोल ज्ञान आहे का, याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. शेतीविषयक माहिती व ज्ञान असलेल्या नेत्यांना या मंत्रिगटात स्थान दिले असते तर आतापर्यंत तोडगा निघाला असता, असा टोलाही शरद पवार यांनी हाणला.

पंतप्रधान माेदींवर टीका

या आंदोलनाला राजकीय पक्षांची फूस आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचाही पवारांनी यावेळी समाचार घेतला. या मागे कोणत्याही पक्षाचा हात नाही. उलट शेतकऱ्यांनीच राजकीय पक्षांना आंदोलनापासून चार हात लांब ठेवले आहे. अशावेळी या आरोपात तथ्य उरत नसल्याचे पवार म्हणाले.

आम्ही कोणाचे ऐकून घेणार नाही. आम्हाला हव्या त्याच सुधारणा आम्ही करणार, असे लोकशाहीमध्ये सरकार कसे म्हणू शकते? शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविषयी जर काही आक्षेप होते तर त्याविषयी सरकारने त्यांच्याशी आधीच चर्चा करणे आवश्यक होते. - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकार