शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच भाजपचा केंद्रात एकही मुस्लीम खासदार नाही; मात्र अजूनही आहे वाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:06 IST

एम. जे. अकबर, सयद जफर इस्लाम आणि केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपचे राज्यसभेत तीन मुस्लीम समुदायाचे खासदार होते.

- शरद गुप्तानवी दिल्ली :  देश काँग्रेसमुक्त करण्याचा निर्धार करणारा भाजपच अखेर स्वत: केंद्रात मुस्लीममुक्त झाला. भाजपच्या ४२ वर्षांच्या इतिहासात  लोकसभा आणि राज्यसभेत  मुस्लीम समुदायाचा  एकही खासदार आणि केंद्रीय मंत्रिमंडळात एकही प्रतिनिधी नसण्याची ही पहिलीच वेळ असेल.

एम. जे. अकबर, सयद जफर इस्लाम आणि केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपचे राज्यसभेत तीन मुस्लीम समुदायाचे खासदार होते. परंतु, राज्यसभेच्या  द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली नाही. ‘मी टू’ प्रकरणात अकबर यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, त्यांचे राज्यसभा सदस्यत्व वाचले. २०१३ मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झालेले सयद जफर इस्लाम यांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने उमेदवारी देऊन खासदार करण्यात आले होते. परंतु, यावेळी दोघांना उमेदवारीपासून वंचित ठेवले.

आरिफ बेग आणि सिकंदर बख्त भाजपचे मुस्लीम चेहरे होते. सत्तेत आल्यानंतर मुख्तार अब्बास नक्वी हे १९९८ मध्ये रामपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. १९९९ ते २००४ पर्यंत सयद शाहनवाज हुसैन हे किशनगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आणि केंद्रात मंत्री होते. ते भागलपूरचेही खासदार होते.

अजूनही आहे वाव...राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीनंतर  नामनिर्देशित  ७ जागांपैकी भाजपला एखाद्या मुस्लीम नेत्याची नियुक्ती करण्यास वाव आहे. या निवडणुकीत भाजपने संघ परिवाराचे निकटवर्ती मानले जाणारे विनय सहस्रबुद्धे आणि ओम प्रकाश माथूर या दोन राज्यसभा सदस्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली नाही. याशिवाय माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, उद्योगपती संजय सेठ गौतम आणि जयप्रकाश निषाद यांनाही तिकीट दिले नाही.

काँग्रेसअंतर्गत विरोधाचा लाभ...राज्याबाहेरच्या उमेदवारांना  राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेल्या नाराजीचा लाभ घेण्यासाठी भाजपने हरयाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रात अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेसचे अनेक नाराज आमदार आणि खासदार भाजपचा पाठिंबा असलेल्या या अपक्ष उमेदवारांना मते देऊन विजयी करू शकतात, असे भाजपला वाटते.

टॅग्स :BJPभाजपाMuslimमुस्लीम