खाद्यसंस्कृती
By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:58+5:302015-04-10T23:29:58+5:30
सेसमे हनी टोफू

खाद्यसंस्कृती
स समे हनी टोफूसाहित्य :१५० ग्रॅम टोफू१ टी स्पून भाजलेले तीळ१ मध्यम लाल भोपळी मिरची१ लहान कांदा७-८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून१ इंच आले, उभे पातळ काप (मॅचस्टीकसारखे)२ हिरव्या मिरच्या१ टी स्पून मधदीड टी स्पून सोया सॉस१/२ टी स्पून व्हिनेगरचवीपुरते मीठतेलकृती :१) भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे करावेत. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा.२) टोफूचे मध्यम चौकोनी तुकडे करावेत. तव्यावर थोडे तेल घालून टोफू थोडा लालसर करून घ्यावा.३) कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात लसूण आणि आले परतावे. नंतर हिरवी मिरची घालावी आणि कांदा परतून घ्यावा. लाल भोपळी मिरची थोडीशी परतावी.४) सोया सॉस घालून मिक्स करावे. लगेच फ्राईड टोफू घालून मिक्स करावे.५) चवीपुरते मीठ आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करून आच बंद करावी.६) भाजलेले तीळ गरजेनुसार मिक्स करावेत. मध घालून हलकेच मिक्स करावे. गरमच सर्व्ह करावे.