शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 17:11 IST

जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यात आता घाबरण्याची गरज नाही.

नवी दिल्लीः जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यास आता घाबरण्याची गरज नाही. खरं तर नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास 10 टक्के जास्त दंड आकारला जात आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचं चलन आपल्याकडून वसूल केलं जातं. परंतु एवढं मोठं चलन पाठवल्यानंतर वाहन चालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त 100 रुपयांमध्ये एवढ्या जास्त रकमेचं चलन आपण वाचवू शकतो. परंतु त्यासाठी ई-चलन पाठवल्यानंतर ते तात्काळ भरू नये. चलन पाठवल्यास घाबरू नकाखरं तर अनेक राज्यात नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यापासून ट्रॅफिक पोलिसांकडून आतापर्यंत दंडाच्या स्वरूपात लोकांकडून 1.41 लाख रुपयांचा चलन फाडण्यात आलं आहे. अशातच तुमच्याकडून चलन वसूल करण्याचं ठरवल्यास अजिबात घाबरू नका. पहिल्यांदा आपण वाहतुकीचा कोणता नियम मोडल्याचा आरोप लावण्यात आला आहे ते माहिती करून घ्या, त्यानंतर पुढची कारवाई करा.कोर्टात चलन भरण्याचा आहे पर्यायविशेष म्हणजे आपण न्यायालयात जाऊनही चलन भरू शकता. म्हणजेच ट्रॅफिक पोलिसांकडेच चलन भरण्याची आवश्यकता नाही. फक्त 100 रुपयांमध्ये भारी भक्कम चलन भरण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. 100 रुपयांत कसा वाचणार चलनजर वाहन चालवत असताना गाडीचं एखादं कागदपत्र नसल्यास मोठ्या रकमेचं चलन फाडलं जातं. खरं तर गडबडीत बऱ्याचदा आपण गाडीची कागदपत्र घरीच विसरतो. ज्यात ड्रायव्हिंग लायसन्सबरोबर गाडीचं नोंदणी पत्र आणि पीयूसी असते. अशाच वेळी जर आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास मोठं चलन फाडलं जाऊ शकते. पोलिसांनी चलन फाडलं असलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही. चलनची रक्कम तात्काळ भरू नका. खरं तर अशा वेळी आपल्याकडे 15 दिवसांचा अवधी असतो. जिथे आपण कोर्टात जाऊन गाडीचे कागदपत्र दाखवू शकता. त्यामुळे हजारो रुपयांचं फाडलेल्या चलनऐवजी 100 रुपये भरून आपण दंडापासून वाचू शकता. यात इन्शुरन्स पेपर्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पीयूसीचा समावेश आहे. चुकी असल्यास माफ होणार नाही चलनचलन फाडण्यापूर्वीच गाडीचे पेपर तयार असल्यास चलन माफ होऊ शकते. जर आपल्याकडे इन्शुरन्स पेपर्स नसल्यास 15 दिवसात आपण कोर्टात चलन भरू शकता. परंतु तर इन्शुरन्स रिन्यू केलेलं नसल्यास आपल्याला चलनच्या स्वरूपात केलेला दंड भरावा लागणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस