शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष व चिन्हाबाबतच्या आदेशांचे पालन करा, दोन्ही पवार गटांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:16 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने १९ मार्च रोजी पक्षाच्या नाव व चिन्ह वापरासंदर्भात दिशानिर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन होत नसल्याच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणूक व चार राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी’ हे चिन्ह वापरावे व त्यासंदर्भात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करावे. 

तसेच अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेले ‘घड्याळ’ हे चिन्ह ‘न्यायप्रविष्ट’ असल्याचा उल्लेख इंग्रजी, हिंदी व मराठी दैनिकांमध्ये नोटीस जारी करून तसेच प्रचारादरम्यान फलकांवरही उल्लेख करण्याचे आदेश दिले. तसेच १९ मार्च रोजी यासंदर्भात दिलेल्या आदेशांमध्ये फेरबदल करण्याची मागणी फेटाळून लावली. 

‘न्यायप्रविष्ट’ जाहिरात प्रसिद्ध करण्याची ग्वाही- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ चिन्ह ‘न्यायप्रविष्ट’ असल्याच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येतील. - पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आज अजित पवार गटाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार