सावकारी व्यवहारातून तरुणावर प्राणघातक हल्ला फुलेनगर : धारदार शस्त्राने वार केल्याने तरुण जखमी
By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:25+5:302017-01-14T00:06:25+5:30
पंचवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणार्या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शुक्र वारी दुपारी घडली आहे.

सावकारी व्यवहारातून तरुणावर प्राणघातक हल्ला फुलेनगर : धारदार शस्त्राने वार केल्याने तरुण जखमी
प चवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणार्या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शुक्र वारी दुपारी घडली आहे. या घटनेत चंदू विष्णू सावंत हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराडवस्तीत राहणार्या चंदू सावंत याने काही दिवसांपूर्वी परिसरातील संशयित आरोपी शरद लोखंडेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. सावंत याने व्याजाने घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी संशयित लोखंडे याने तगादा लावला होता. सावंत शुक्र वारी दुपारी परिसरात दिसताच संशयित शरद लोखंडे, प्रेम शिंदे व कपिल शिंदे अशा तिघा संशयितांनी सावंत याला रस्त्यात अडविले. संशयितांच्या हातात धारदार शस्त्र असल्याने सावंत याने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. त्यावेळी संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व हातातील धारदार शस्त्राने वार केला. त्यात सावंत याच्या कानाला, गालावर व हातावर घाव लागल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींविरोधात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)इन्फो-संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचंदू सावंत या युवकावर सावकारी व्यवहारातून धारदार शस्त्राने वार करून जखमी करणारा संशयित शरद लोखंडे याच्या विरुद्ध गंभीर मारहाण करणे, परिसरात दहशत निर्माण करणे, जबरी चोरी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी याच संशयिताने पंचवटी पोलिसांविरुद्ध तक्र ार दाखल केली होती, असे पोलिसांनी सांगितले.