शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:07 IST

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे.

बंगळुरू : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळघार पावसामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे अनेकांनी चक्क ट्रॅक्टर आणि बुलडाेझरवर बसून कार्यालयाची वाट धरली. तर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बंगळुरूमध्येच घडली. तर हवामान खात्याने कर्नाटकसह आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. तर बाेटींमधून अशा परिस्थितीत आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये बसून अनेक कर्मचारी कार्यालयात जात आहेत. त्यासाठी ते प्रत्येकी ५० रुपये माेजत आहेत. तर काही जण चक्क बुलडाेझरवर बसून जलमय रस्त्यांवरून मार्ग काढताना दिसले. मात्र या पूरस्थितीमुळे आयटी कंपन्यांचे सुमारे २५० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)

व्हाईटफील्ड भागात तरुणीचा मृत्यूव्हाईटफील्ड भागात अखिला नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. जलमय झालेल्या रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली हाेती. त्यामुळे आधार घेण्यासाठी तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र, त्यात विद्युत प्रवाह असल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

केरळमध्ये दाेन जण गेले वाहूनकेरळमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी तिरुअनंतपूरमजवळ एका धबधब्यामध्ये अचानक आलेल्या पुरात दाेन पर्यटक वाहून गेले. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. कावेरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावांना इशारा दिला आहे. तिरुअनंतपूरम, पथ्थनपीथिटा, इडुक्की इत्यादी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

केवळ दोन विभागांमध्ये समस्या : मुख्यमंत्री बोम्मईकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूतील परिस्थितीसाठी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारला दाेषी ठरविले. अतिवृष्टी आणि जलसाठे ओव्हरफ्लो भरल्यामुळे काही भागात पाणी भरले. केवळ दोन विभागांमध्येच अशी स्थिती असून चित्र मात्र पूर्ण शहर तुंबल्याचे रंगविणत येत असल्याचे बोम्मई म्हणाले.

‘अनअकॅडमी’च्या संस्थापकांनाही ट्रॅक्टरचा आधार -या महापुरात प्रसिद्ध ‘स्टार्टअप्स’चे संस्थापक किंवा सीईओंसाठी देखील ट्रॅक्टर मोठा आधार ठरला आहे. ‘अनअकॅडमी’चे संस्थापक गौरव मुंजाळ यांची सोसायटीही पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि पाळीव कुत्र्यालाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाचवावे लागले.

आलिशान कार सोडून लोक ट्रॅक्टरवर -परिस्थिती किती वाईट आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, अतिश्रीमंताच्या सोसायटीतही लेक्सस, बेंटले, बीएमडब्ल्यू अशा आलिशान कार पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. तर, लोक जीव वाचवण्यासाठी फक्त जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरवर ठेवून तेथून बाहेर पडत आहेत. कोट्यवधींच्या महागड्या कारही त्यांच्या कामी आल्या नाहीत, अखेर ट्रॅक्टरनेच तारले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटक