शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक हरिद्वारमध्ये दारूचा महापूर! तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १०७ पेट्या दारू जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 06:54 IST

समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे.

रवी टाले -

हरिद्वार : उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांपैकी सर्वाधिक ११ जागा असलेल्या हरिद्वार जिल्ह्यातील निवडणुकीत दारूचा जणू पूर आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १०७ पेट्या दारू जप्त केली. 

विष्णू आणि शिव या हिंदू धर्मातील दोन प्रमुख देवतांच्या तीर्थयात्रांचे प्रवेशद्वार असल्यामुळे हरिद्वार असे ज्या स्थानाचे नाममाहात्म्य आहे, समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे.

हरिद्वारचे जिल्हाधिकारी विनय शंकर पांडेय यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर होण्याची शंका असल्यामुळे अबकारी विभागाला सजग केले आहे. त्यामुळे अबकारी विभागाने जिल्ह्यातील सर्व दारू दुकानांवर क्लोज सर्किट (सीसी) कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नजर ठेवली आहे. त्यासाठी पाच कर्मचाऱ्यांचा चमू २४ तास सज्ज असतो. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४.३६ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ, १.९५ कोटी रुपयांची दारू आणि २.४८ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.

मदन कौशिक, हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला!- मदन कौशिक आणि काँग्रेसचे बडे नेते हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कौशिक हरिद्वार मतदारसंघातून सलग पाचवा विजय मिळविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत, तर रावत यांची कन्या अनुपमा हरिद्वार ग्रामीणमधून लढत लढत आहे. - गत निवडणुकीत रावत मुख्यमंत्री असताना पराभूत झाले होते. त्यामुळे अनुपमा रावत यांच्यापुढे पित्याची प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. स्वत: हरीश रावत यावेळी कुमाऊं विभागातील लालकुआं मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकPoliceपोलिस