पम्पोरमध्ये तिस-या दिवशीही चकमक सुरूच, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By Admin | Updated: October 12, 2016 11:45 IST2016-10-12T09:19:23+5:302016-10-12T11:45:08+5:30
पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक तिस-या दिवशीही सुरूच आहे.

पम्पोरमध्ये तिस-या दिवशीही चकमक सुरूच, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.12 - पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक तिस-या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, सुरक्षा दलाने चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी जवानांनी दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम आता अधिक तीव्र केली आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
आणखी बातम्या
पम्पोर हल्ला, दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच
भारतीय जवानांना टार्गेट करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दोन ते तीन दहशतवाद्यांनी पम्पोरमधील ईडीआय हॉस्टेलच्या इमारतीत काही दिवसांपूर्वी आश्रय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे हा परिसर पूर्णतः रिकामा करण्यात आला आहे. सोमवारपासून दोन्ही बाजूकडून तुफान गोळीबार सुरू आहे.
#FLASH One terrorist gunned down by security forces in Pampore (J&K) encounter: Police Sources
— ANI (@ANI_news) October 12, 2016