तात्पुरत्या एन-ए वर प्लॉटींगची धडका विक्री
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:47+5:302015-02-14T23:51:47+5:30
लक्ष्मणराव सिरफुलेच्या शेतात रात्रीतूनच केला रस्ता, कोर्टात धाव

तात्पुरत्या एन-ए वर प्लॉटींगची धडका विक्री
ल ्ष्मणराव सिरफुलेच्या शेतात रात्रीतूनच केला रस्ता, कोर्टात धावहदगाव : नगरपालिकेच्या हद्दीतील प्लॉटींगचे एन.ए. जिल्हाधिकारी कार्यालयातून करायचे असतात तर ग्रामीण भागातील एन.ए. तहसील कार्यालयातून परंतु सदर मंडळीने तहसीलमधून तात्पुरते एन.ए. काढून त्यावरच विक्री केली आहे. नंतर मुदत संपल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतलेलीच नाही.ग्रामीण हद्दीतील कौठा, डोंगरगाव, गोजेगाव भानेगाव आदी ठिकाणावरील प्लॉटींग विक्रीसाठी तहसील कार्यालयातून एन.ए. घेता येतात तर नगरपालिकेच्या हद्दीतील एन.ए.साठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्याऐवजी तात्पुरता एन.ए. तहसील कार्यालयातून ६ महिन्यासाठी घेतला जातो. यासाठी खरेदीखत करुन घेण्यासाठी चोहोबाजुने २० फुटाचे रस्ते दाखविले. १०० फूट रोडच्या जागेवरच ३०/५० ची दोन मजली भव्य इमारत उभारली आहे.तात्पुरते एन.ए. दाखवून नियमावलीत राहते घर, लाईट, पाणी, रस्ते, मोकळी जागा दाखवून शासनाचा महसूल बुडविला जातो. एका बिल्डरने गट ५२/५३/२७ मध्ये शेतकरी लक्ष्मणराव सिरफुले यांच्या पिक असलेल्या शेतामध्ये मध्यरात्री मुरुम आणून रस्ता केला. मासिक हप्त्यावर प्लॉटींग विक्री सुरू केली. या शेतकर्याने सदरचा रस्ता पाऊलवाड असल्याचे निदर्शनास आणून दिले. केलेला रस्ता उखडून टाकला. त्यामुळे बिल्डरला चांगलीच अडचण आली आहे. ग्रामीण भागातील प्लॉटींग खरेदी केल्याने बांधकाम परवानगीसाठी ग्रामसेवक अडवणूक करतात. त्यांच्या सोबतीला लोकप्रतिनिधीही असतात. फुकटची कटकट नको म्हणून ग्राहक जमेल तर चिरीमिरी देऊन मोकळा होतो. अथवा लफडे नको म्हणून गप्प बसतो. असा हा तोंड दाबून बुक्याचा मार सुरू असतो.या प्लॉटींग विक्री योजनेसोबत लक्कीड्रॉ असतो. दर महिन्याला हा ड्रॉ करण्यात येतो. यामध्ये एका ग्राहकाला मासिक हप्त्यामध्येच प्लॉट मिळतो. एक ड्रॉ सोडून दुसर्या सोडतला १ फ्री प्लॉट दिला जातो. त्यामुळे ग्राहक लालचेमध्ये येतो. ग्राहकाची गर्दी होते. जाहिरातीमध्ये माहूर देवस्थान जवळ आहे. शाळा जवळ आहे. बाजारपेठ, दवाखाना जवळ असल्याचे रंगीतचित्र दाखविण्यात येतात तर प्रतिष्ठीत मंडळीच्या नावे चार दोन प्लॉट दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते.---------- अपूर्ण------