अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टचा मेगा सेल

By Admin | Updated: July 12, 2017 18:19 IST2017-07-12T18:13:03+5:302017-07-12T18:19:37+5:30

सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपन्या भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे.

Flipkart's Mega Sale Now After Amazon | अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टचा मेगा सेल

अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टचा मेगा सेल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपन्या भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे. दोन दिवसांपूर्वी अॅमेझॉन कंपनीने ग्राहकांसाठी एका सेलचे आयोजन केले होते. या सेलला अॅमेझॉन प्राइम डे असे या नाव देण्यात आले होते. तसेच, हा सेल 30 तासांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. या सेलला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता असाच सेल अॅमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टने सुद्धा सुरु केला आहे. फ्लिपकार्टने मेगा सेल या नावाने या सेलचे आयोजन केले आहे. 
फ्लिपकार्टने या मेगा सेलचे आयोजन बुधवारपासून सुरु केले असून यामध्ये जवळजवळ 80 टक्क्यांपर्यंत वस्तूंच्या खरेदीवर सवलत देण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या प्राइम डे सेलनुसार फ्लिपकार्टने सुद्धा विशेष वस्तू म्हणजेच नव-नवीन मोबाईलटे लॉन्चिंग करणार आहे. तसेच, एचडीएफसीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे वस्तूंची खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. याचबरोबर, ग्राहक फ्लिपकार्टच्या यूपीआय आधारित पेमेंट अॅप फोनपे वापरत असतील, तर ते 15 टक्के कॅशबॅक सुद्धा मिळवू शकतात. विशेष म्हणजे फ्लिपकार्टमधील टॉप ऑफर्समध्ये साड्या, फुटवेअर, बॅग यासारख्या वस्तूंच्या खरेदीवर 70 टक्के सवतल देण्यात आली आहे. 
 
आणखी बातम्या वाचा

(Good news: फ्लिपकार्टवर फादर्स डे स्पेशल ऑफर; आयफोन 6 फक्त...)

(व्होडाफोनची रमजान स्पेशल ऑफर, 5 रुपयात अनलिमिटेड डाटा)

 
अॅमेझॉनच्या सेलमध्ये काय होते?
अॅमेझॉनने भारतात पहिल्यांदाच प्राइम डे सेल आणला होता.  याआधी भारताशिवाय अशाप्रकारच्या सेलचे इतर ठिकाणी अॅमेझॉनने दोनवेळा आयोजन केले होते. त्यावेळी कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतात अॅमेझॉजनने पहिल्यांदाच प्राइम डे सेल आणल्यामुळे या सेलला सुद्धा ऑनलाइन ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. हा सेल अॅमेझॉन प्राइम युजर्ससाठी असून यामध्ये व्हिडिओ कंटेंटशिवाय बराच वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार, असे कंपनीचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितले होते. 
 

 

Web Title: Flipkart's Mega Sale Now After Amazon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.