दहशतवाद्यांशी चकमक; काश्मिरात जवान शहीद

By Admin | Updated: September 2, 2015 23:26 IST2015-09-02T23:26:26+5:302015-09-02T23:26:26+5:30

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद झाला, तर दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला.

Flint with terrorists; Kashmir veteran martyr | दहशतवाद्यांशी चकमक; काश्मिरात जवान शहीद

दहशतवाद्यांशी चकमक; काश्मिरात जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद झाला, तर दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमक सकाळी ७ वाजता सुरू झाली. दहशतवादी दडून बसले असल्याची गोपनीय सूचना प्राप्त झाल्यावर सुरक्षा दलाने राफियाबाद परिसराला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली. तेवढ्यातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक उडाली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. मृत दहशतवाद्याचे नाव रियाज अहमद असून, तो सोपोरजवळील ब्राथर कालनचा रहिवासी होता. त्याचा संबंध हिजबुल मुजाहिदीनशी होता. लष्कर- ए- इस्लामचे दोन दहशतवादी या भागात लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Flint with terrorists; Kashmir veteran martyr