श्रीनगरमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार
By Admin | Updated: March 5, 2017 01:47 IST2017-03-05T01:47:30+5:302017-03-05T01:47:30+5:30
शहरालगतच्या तराल क्षेत्रात शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, इतर ४-५ जणांचा शोध सुरु आहे.

श्रीनगरमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.05 - शहरालगतच्या तराल क्षेत्रात शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, इतर ४-५ जणांचा शोध सुरु आहे. तराल क्षेत्रातील शोध मोहिमेत सैन्याच्या विशेष पथकाने सायंकाळी एका घराला वेढा घातल्यानंतर चकमक सुरु झाली. सैन्याने घराचा अर्धा भाग उद्ध्वस्त केल्यानंतरही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुच ठेवला होता. रात्रीला गोळीबार थांबल्यानंतर झडती घेतली असता सैन्यास एका पाकिस्तानी दहशतवाद्याचे शव आढळले, तर इतर फरार झाले होते. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने एका सैनिकाची रायफल हिसकावून घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाने कर्फ्यू जाहीर केला आहे.