विमानतळाजवळ धूर दिसल्याने विमानांच्या उड्डाणास विलंब

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:47+5:302015-02-11T23:19:47+5:30

चेन्नई : चेन्नई विमानतळाजवळ धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर पाच विमानांचे उड्डाण आणि आगमन रोखण्यात आले. हा धूर विमानतळाच्या धावप˜ीपर्यंत आल्यानंतर तेथे दृश्यता कमी झाल्यामुळे विमानांच्या उड्डाण व आगमनास ३० मिनिटांचा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Flight flight delay due to the presence of the airport | विमानतळाजवळ धूर दिसल्याने विमानांच्या उड्डाणास विलंब

विमानतळाजवळ धूर दिसल्याने विमानांच्या उड्डाणास विलंब

न्नई : चेन्नई विमानतळाजवळ धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर पाच विमानांचे उड्डाण आणि आगमन रोखण्यात आले. हा धूर विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत आल्यानंतर तेथे दृश्यता कमी झाल्यामुळे विमानांच्या उड्डाण व आगमनास ३० मिनिटांचा विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिरुचिरापल्लीहून येणारे खासगी विमान सकाळी १०.३० वाजता विमानतळावर उतरणार होते. परंतु दृश्यता कमी असल्याकारणाने हे विमान अन्यत्र वळविण्यात आले. त्यानंतर आणखी पाच विमानांचे उड्डाण व आगमन थांबविण्यात आले. ३० मिनिटांपर्यंत वाहतूक खोळंबल्यानंतर दृश्यता वाढी आणि विमानांचे आवागमन पूर्ववत सुरू झाले. विमानतळाच्या बाहेरून हा धूर विमानतळावर आल्याचे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Flight flight delay due to the presence of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.