शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:26 IST

इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे.

नवी दिल्ली : इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे. आता एअर इंडियानेही तसाच निर्णय घेतला आहे. इराणच्या हवाई हद्दीतून अमेरिका, युरोपला जाणाऱ्या आपल्या विमानांचे हवाई मार्ग एअर इंडियाने बदलले आहेत. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला असून, त्यामुळे ही दक्षता घेण्यात आली आहे.या बदलांमुळे दिल्ली व मुंबईहून अमेरिका, युरोपला जाणा-या विमानांच्या प्रवासाचा कालावधी अनुक्रमे २० मिनिटे व ३० ते ४० मिनिटांनी वाढणार आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. इराण, इराक, ओमान, पर्शियन आखातातील प्रदेशावरून उड्डाण करताना दक्षता बाळगावी, अशी सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याने भारतीय विमान कंपन्यांना केली होती. त्यानंतर एअर इंडियाने हा निर्णय घेतला. इराणच्या तेहरानजवळून उड्डाण करीत असलेले युक्रेनचे एक विमान बुधवारी कोसळून १७० हून अधिक प्रवासी ठार झाले. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या विमान कंपन्यांना इशारा दिला होता. भारतीय नागरिकांनी आवश्यकता नसेल तर सध्या इराकमध्ये जाणे टाळावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.इराणी लष्कराने अमेरिकेच्या इराकमधील दोन लष्करी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराकमधील स्थिती बिघडलेली असली तरी बगदाद येथील भारतीय राजदूतावास, एर्बिल येथील वकिलातीचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असेही भारताने स्पष्ट केले आहे. इराकमध्ये जाताना पाकिस्तानी नागरिकांनी दक्षता बाळगावी, अशी सूचना इम्रान खान सरकारने केली आहे. जे पाकिस्तानी नागरिक सध्या इराकमध्ये आहेत त्यांनी बगदादमधील पाकिस्तानी राजदूतावासाच्या नित्यसंपर्कात राहावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.>शांततेसाठी मध्यस्थी करावी : इराणकमांडर जनरल कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या केल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताने मध्यस्थी केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असे इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी यांनी सांगितले. इराणला युद्ध नको आहे. मध्य-पूर्वेतील देशांत शांती, समृद्धी नांदावी अशीच इराणची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.अमेरिकेचे स्वत:च्या विमानांवर निर्बंधइराक, इराण, ओमान व पर्शियन आखातातील हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण करण्यास ट्रम्प सरकारने बंदी घातली आहे. मध्य-पूर्वेतील वाढलेल्या लष्करी कारवाया लक्षात घेता अमेरिकी विमानांना त्या भागातून उड्डाण करताना मोठा धोका संभवतो. त्यामुळेच त्यांना मनाई करण्यात आल्याचे अमेरिकेच्या हवाई वाहतूक खात्याने (एफएए) म्हटले आहे.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिका