फ्लेचर यांचे पंख छाटले

By Admin | Updated: August 20, 2014 02:41 IST2014-08-20T02:41:55+5:302014-08-20T02:41:55+5:30

कसोटी मालिकेत इंग्लंडकडून वस्त्रहरण झाल्यानंतर भारताला सावरण्यास बीसीसीआयने संघ संचालकपदाची धुरा रवी शास्त्रीकडे सोपविली आहे.

Fletcher's wings were cut off | फ्लेचर यांचे पंख छाटले

फ्लेचर यांचे पंख छाटले

नवी दिल्ली : कसोटी मालिकेत इंग्लंडकडून वस्त्रहरण झाल्यानंतर भारताला सावरण्यास बीसीसीआयने संघ संचालकपदाची धुरा रवी शास्त्रीकडे सोपविली आहे. माजी कसोटीपटू संजय बांगर आणि माजी वेगवान गोलंदाज भारत अरुण शास्त्रीच्या दिमतीला असतील. या फेररचनेमुळे डंकन फ्लेचर यांचे अस्तित्व नावापुरते उरले आहे. 
 इंग्लंडविरुद्ध 25 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पाच वन-डे दरम्यान संघाला मानसिकदृष्टय़ा कणखर करणा:या मार्गदर्शकाची जबाबदारी शास्त्रीवर टाकण्यात आली आहे. फ्लेचर यांचे पंख छाटण्यासाठीच शास्त्रीला मैदानात उरवल्याचा तर्क आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या बांधणीचा शिल्पकार संजय बांगर आणि भारत अरुण सहप्रशिक्षकांच्या भूमिकेत राहणार असून आर. श्रीधर हे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 1-3 असा मानहानीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर हा निर्णय घेतला. फ्लेचर यांचा करार एप्रिल 2क्15 र्पयत असल्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात आले तर गोलंदाजी कोच ज्यो डावेस आणि क्षेत्ररक्षण कोच ट्रॅव्हर पेनी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
 
टीम इंडियासाठी शास्त्री मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2क्क्7 साली विंडीजमध्ये झालेल्या वल्र्डकपमध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर व अस्वस्थ खेळाडूंनी आवाज उठविल्यानंतर कोच ग्रेग चॅपेलला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर बांगला देश दौ:यासाठी शास्त्रीची नियुक्ती करण्यात आली होती. -वृत्त/क्रीडा

 

Web Title: Fletcher's wings were cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.