बोट बुडून वीस बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 05:11 IST2018-05-16T05:11:38+5:302018-05-16T05:11:38+5:30

आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये आठवडा बाजार आटोपून ४० आदिवासी बोटीने परतत होते.

Fleet drown, twenty missing | बोट बुडून वीस बेपत्ता

बोट बुडून वीस बेपत्ता

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये आठवडा बाजार आटोपून ४० आदिवासी बोटीने परतत होते. देवीपटणम व वारापल्ली दरम्यान गोदावरी नदीत ही बोट बुडाली. या आदिवासींपैकी वीस जण बेपत्ता आहेत तर अन्य वीस प्रवासी पोहून सुखरुप किनाऱ्याला लागले.
ही घटना मंगळवारी संध्याकाळी चार वाजता घडली. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. ही बोट कशामुळे नदीत बुडाली याचे नेमके कारण अद्यापी कळू शकलेले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Fleet drown, twenty missing