मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा ध्वज!

By Admin | Updated: November 25, 2015 00:09 IST2015-11-25T00:09:03+5:302015-11-25T00:09:03+5:30

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या बिजबेहरा भागातील वडिलोपार्जित घरावर मंगळवारी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

The flag of the Chief Minister's house! | मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा ध्वज!

मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा ध्वज!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या बिजबेहरा भागातील वडिलोपार्जित घरावर मंगळवारी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
सोमवारच्या चकमकीत ठार झालेल्या हिजबुल मुजाहिदिनच्या तीन दहशतवाद्यांची घरेसुद्धा याच परिसरात आहेत.
प्रत्यक्षदर्र्शींच्या सांगण्यानुसार एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी निदर्शकांपैकी कुणीतरी सईद यांच्या घरावर पाकिस्तानचा ध्वज फडकविला. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: The flag of the Chief Minister's house!