फिक्सिंग निकाल

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:16+5:302015-01-22T00:07:16+5:30

आयपीएल फिक्सिंगचा

Fixing result | फिक्सिंग निकाल

फिक्सिंग निकाल

पीएल फिक्सिंगचा
निकाल आज
नवी दिल्ली : २०१३ च्या आयपीएलमधील फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणाचा निकाल सवार्ेच्च न्यायालय उद्या गुरुवारी जाहीर करणार आहे. बीसीसीआयचे निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या दुटप्पी भूमिकेचे भविष्य या निकालामुळे निश्चित होईल.
न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. कलिफुल्ला खंडपीठाने गेल्या १७ डिसेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी ऑगस्ट २०१३ पासून अनेक अंतरिम आदेश पारित झाले. त्यात न्या. मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय चौकशी समितीचा समावेश होता. श्रीनिवासन, त्यांचे जावई मयप्पन, राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा, क्रिकेट प्रशासक सुंदर रमन, यांची मुदगल समितीने चौकशी केली. आयपीएलच्या सहाव्या पर्वांत खेळाची प्रतिमा डागाळल्याबद्दल समितीने सहा जणांवर ठपका ठेवला होता.(वृत्तसंस्था)

Web Title: Fixing result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.