शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
2
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
3
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
4
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
5
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
6
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
7
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
8
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
9
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
10
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
11
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

अतिरिक्त साखरेबाबत लवकरच तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:52 AM

उत्पादन झालेली जादा साखर शक्य तितकी निर्यात करता येईल.

सुरेश भटेवरा ।नवी दिल्ली : यंदा उसाचे व साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नियुक्त मंत्रिसमुहाचे प्रमुख नितीन गडकरींनी मंगळवारी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय साखर महासंघ, इस्मा तसेच खासगी साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बैठकीनंतर या चर्चेची सविस्तर माहिती शरद पवारांनी दिली.पवार म्हणाले की, उत्पादन झालेली जादा साखर शक्य तितकी निर्यात करता येईल. ती करावी. मात्र त्यातून जो तोटा होईल, तेवढी रक्कम निर्यातदार कारखान्यांना ज्यांनी ऊ स दिला, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी. साखरेचा बफर स्टॉक सरकारी गोदामांमध्ये राहू द्यावा, मात्र त्याच्या साठवणीसाठी येणारा खर्च व व्याज केंद्र सरकारने सोसावे. साखर कारखान्यांनी मळीचे इथेनॉल बनवावे, पेट्रोलियम मंत्रालयाच्या साह्याने इथेनॉलला तेल कंपन्यांकडून मिळवून द्यावेत. ब्राझिलमधे साखर तयार न करता अतिरिक्त ऊ साचे इथेनॉल बनवले जाते. तसेच उर्वरित गळित हंगामात जे कारखाने १00 टक्के इथेनॉल करतील, त्यासाठी अधिक दर द्यावेत, अशा सूचना व मागण्या चर्चेतून पुढे आल्या.संबंधित मंत्रालयांनी तसे प्रस्ताव तयार करावेत. अंतिम निर्णय सरकार घेतईल, असे गडकरींनी बैठकीत स्पष्ट केल्याचे पवारांनी सांगितले. याच प्रश्नावर केंद्रीय मंत्रीगटाची पीएमओतील वरिष्ठ अधिकाºयांसह सोमवारी बैठक झाली होती. त्यात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन व त्यावरील जीएसटी कमी करण्याचा विचार झाला होता. याखेरीज साखरेवर उपकर लावण्यासंबंधी चर्चा झाली.राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नाईकनवरे, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश वर्मा, खा. राजू शेट्टी व साखर कारखानदारांचे प्रतिनिधी बी.बी. ठोंबरे बैठकीला उपस्थित होते.तोटा भरून काढण्यासाठी साह्यभूतपवार म्हणाले की, ३५ टक्के साखर ग्राहकांना विकली जाते आणि ६५ टक्के साखर, थंडपेये, मिठाई, चॉकलेटस, औषधे बनवणाºया कंपन्या आदींना पुरवली जाते. या कंपन्यांना स्वस्त दरात साखर न पुरवता त्यावर उपकर लावण्याचा प्रस्ताव यापूर्वीही आला होता. त्याच प्रस्तावावर केंद्र सरकार पुन्हा विचार करीत आहे. त्या उपकरातून मिळणारी रक्कम साखर कारखाने व ऊ स उत्पादकांचा तोटा भरून काढण्यासाठी साह्यभूत ठरेल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने