शासकीय योजनातील अडचणी दूर करा संगमनेर : अपंग सेनेची मागणी

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

संगमनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना लाभार्थ्यांना येणार्‍या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी अपंग सहाय्य सेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.

Fix problems in government planning Sangamner: Demand for disabled people | शासकीय योजनातील अडचणी दूर करा संगमनेर : अपंग सेनेची मागणी

शासकीय योजनातील अडचणी दूर करा संगमनेर : अपंग सेनेची मागणी

गमनेर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना लाभार्थ्यांना येणार्‍या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी अपंग सहाय्य सेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे यांच्या नेतृत्वाखाली अपंग सेनेचे कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन मागण्या मांडल्या. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे तलाठ्याकडे जमा होतात. मात्र पुढे काहीही कार्यवाही होत नसल्याने अपंग लाभार्थी वंचित राहतात. म्हणून जमा प्रकरणांची पोहच द्यावी, संजय गांधी निराधार समितीत अपंगाची नेमणूक करावी, अपंगांचा विशेष अनुशेष भरण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अपंग निधी धर्च करावा, अपंगांना बी.पी.एल. शिधापत्रिका द्याव्यात, घरकुलांचा लाभ मिळावा, स्वयंरोजगारासाठी समाजकल्याणच्या योजनांचा लाभ मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. याविषयी कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा लहामगे, आनंद खरात, जिजाबाई पाचारणे, विठ्ठल शिंदे, कैलास उदावंत, पोपट हासे, संजय सानप, मिराबाई दिघे, मंदा दातीर, विमल दातीर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fix problems in government planning Sangamner: Demand for disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.