काम पाहून माझी योग्यता ठरवा- स्मृती इराणी

By Admin | Updated: May 29, 2014 14:28 IST2014-05-29T11:03:16+5:302014-05-29T14:28:14+5:30

माझे काम पाहून मगच माझी योग्यता ठरवा असे सांगत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते अजय माकन व इतर टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Fix my eligibility by looking at work - Memory irani | काम पाहून माझी योग्यता ठरवा- स्मृती इराणी

काम पाहून माझी योग्यता ठरवा- स्मृती इराणी

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९ - माझे काम पाहून मगच माझी योग्यता ठरवा  असे सांगत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते अजय माकन व इतर टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. अजय माकन यांनी मंगळवारी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टोमणा मारला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना इराणी यांनी माझ्या कामाच्या आधारावर माझी पारख करा, असे उत्तर दिले आहे.
स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली.  देशाच्या शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण किती, यावरुन निर्माण झालेला वाद चिघळला होता. 
स्मृती इराणी या पदवीधरही नसताना त्यांच्याकडे शिक्षण विषयक धोरण ठरवणारे मंत्रालय कसे सोपवण्यात आले, असा असा प्रश्न विचारण्यात येत होता. खुद्द भाजपातही स्मृती यांना दिलेल्या जबाबदारीवरून नाराजी पसरली आहे. काही नेत्यांनी त्याकडे पक्षाध्यक्ष राजनाथ यांचे लक्षही वेधले, मात्र उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नव्हते. मात्र हा वाद वाढायला लागल्यावर बुधवारी भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत सोनिया गांधींना लक्ष्य केले होते. आत्तापर्यंत या मुद्यावर मौन बाळगणा-या स्मृती इराणी यांनी अखेर गुरूवारी यावर प्रतिक्रिया दिली. माझे काम पाहून मगच माझे मूल्यमापन करा, असे त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Fix my eligibility by looking at work - Memory irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.