शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपूर्वी या मंदिरात पूजा करताना भीती वाटायची; CM योगी असं का म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:25 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या मान सरोवर शिव मंदिर आणि रामलीला मैदानाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले.

गोरखपूर :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या गोरखपूर दौऱ्यावर आहेत. गोरखपूर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान सरोवर शिव मंदिराचे आणि रामलीला मैदानाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचेही उद्घाटन केले. यावेळी सीएम योगी यांनी मान सरोवर मंदिराशी संबंधित त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. 'एक काळ असा होता की येथे पूजा करताना मला भीती वाटायची,' असं योगी म्हणाले.

'पूर्वी भीती वाटायची'श्रावनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरमधील मान सरोवर शिव मंदिरात भगवान भोलेनाथांचा अभिषेक केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'मंदिराची अवस्था पाच वर्षांपूर्वीपर्यंत जीर्ण होती. इथे पूजा करताना मंदिर कधी कोसळेल याची भीती वाटायची. जवळच्या तलावात म्हशी आंघोळ करत असत, तिथे खूप घाण असायची. कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, मात्र आज हे पर्यटनस्थळ असल्याने येथे सुशोभीकरणाचे सर्व काम पूर्ण झाले आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'आज पवित्र श्रावन महिन्याच्या पहिल्या तारखेला मला गोरखपूरच्या मानसरोवर शिवमंदिरात भगवान भोलेनाथांचा अभिषेक करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. रामलीला मैदानाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्पही सुरू करण्याची संधी मिळाली. मला कळविण्यास आनंद होत आहे की, लोकभावनेनुसार येथील उत्कृष्ट पर्यटन सुविधांच्या विकासासोबतच आज सुशोभीकरणाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. मंदिरांच्या उभारणीमुळे प्रवाशांच्या सुविधांचा विकास झाला आहे.'

मंदिराचे सुशोभिकरणमानसरोवर शिवमंदिर सुशोभित करण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह, स्वच्छतागृहे, 50 लोकांची क्षमता असलेला रात्र निवारा, दोन पर्यटक निवारा, संकुलात असलेल्या तलावावरील लाल दगडी रेलिंग, हवनकुंड, लाल दगडी पाथवे, उद्यान, स्त्री-पुरुष व अपंगांसाठी शौचालय ब्लॉक, पार्किंग, सीमा भिंत बांधकाम, लँडस्केपिंग, प्रवेशद्वार, पार्किंगसह सौर पॅनेल आणि व्हिक्टोरिया आणि गार्डन लाइट्स बसविण्यात आले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश