शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमध्ये पडला पाच वर्षांचा मुलगा, २२ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:08 IST

Rajasthan News: राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला.

राजस्थानमधील दौसा येथे एक लहान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आर्यन नावाचा हा मुलगा शेतात खेळत असताना उघड्या बोअरवेलमध्ये पडला आणि मध्ये जाऊन अडकला. दौसा जिल्ह्यामधील कालीखाड गावात ही घटना घडली आहे. येथील आर्यन मीणा नावाचा मुलगा आई गुड्डीदेवीसोबत सोमवारी दुपारी  शेतात जात होता. वाटेतूवन खेळत खेळत जात असताना बोअरवेलजवळ त्याचा पाय घसरला आणि तो १५० फूट बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली.  

दुर्घटनेची माहिती मिळताच दौसाचे जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार, आमदार दीनदयाल बेरवा यांच्यासह पोलीस आणि प्रशासनामधील बरेचसे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्याबरोबरच एनडीआरएफच्या पथकालाही मदतीसाठी बोलावण्यात आले. बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या बाजूला समांतर खड्डा खोदण्यात येत आहे. सोबतच मुलाला बोअरवेलमधून थेट बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र २४ तास लोटत आले तरी या मुलाला बाहेर काढता आलेलं नाही.

मिळत असलेल्या माहितीनुसार मदतकार्यात गुंतलेल्या लोकांनी सांगितले की, आम्ही ही घटना घडल्यानंतर १३ तासांनंतर रात्री २ वाजण्याच्या सुमारास कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचाल पाहिली होती. आता बचाव दलाकडून त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक समांतर बोअरवेल खोदण्यात येत आहे. तसेच अडकलेल्या मुलाला पाईपच्या साथीने ऑक्सिजन पुरवला जात आहे. तसेच दोरी आणि इतर उपकरणांच्या साथीने त्याच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच इतर काही उपकरणांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

समांतर खड्डा खोदण्यासाठी अनेक अर्थमुव्हर्स आणि ट्रॅक्टरची मदत घेतली जात आहे. कालीखाड गावातील एका शेतात खेळत असताना आर्यन उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. ही घटना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघात