हिंसाचार रोखण्यास पाच हजार जवान!
By Admin | Updated: December 25, 2014 03:03 IST2014-12-25T03:03:34+5:302014-12-25T03:03:34+5:30
आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी) बंडखोरांच्या हिंसाचारात

हिंसाचार रोखण्यास पाच हजार जवान!
नवी दिल्ली/गुवाहाटी : आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी) बंडखोरांच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७० वर पोहोचली आहे. यात २१ महिला आणि १८ मुलांचा समावेश आहे. या भागात अजूनही हिंसाचार सुरूच असून, बुधवारी संतप्त आदिवासींनी निदर्शनादरम्यान घरांची जाळपोळ केली आणि एका पोलीस ठाण्यावरही हल्ला केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. बंडखोरांविरुद्ध पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाची संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने निमलष्करी दलाचे पाच हजार जवान तातडीने आसामला रवाना करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.