उरी सेक्टरमध्ये लष्करांनी पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा
By Admin | Updated: June 9, 2017 22:12 IST2017-06-09T17:48:04+5:302017-06-09T22:12:37+5:30
उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्कराने केला आहे.

उरी सेक्टरमध्ये लष्करांनी पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा
ऑनालाइन लोकमत
जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने उधळवून लावला आहे. घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने यमसदनी पाठवले आहे. अजूनही सर्च आॅपरेशन सुरू आहे. उरी सेक्टरमध्ये सीमारेषेवर आज दुपारी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पण तिथे तैनात असलेल्या लष्कराने जोरदार हल्ला चढवत दहशतवाद्यांचा खात्मा केला.
काल (गुरुवारी)ही जम्मू काश्मीरच्या कुपवाडातून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडत त्यांना कंठस्नान घातल होतं.