शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 20:25 IST

दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्दे दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहेत.

श्रीनगर, दि. 26- दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.  यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण सीआरपीएफचे आहेत. तर पाच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.  पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरु झालं. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

दहशतवादी जिल्हा पोलीस वसाहतीमध्ये लपून बसल्यावर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन सुरु करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यामध्ये सुरक्षा दलाचे एकूण ८ दहशतवादी जखमी झाले. ‘इमारतीच्या आतून दोन दहशतवादी गोळीबार करत आहेत,’ अशी माहिती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस लाईमधील सगळ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. लेफ्टनंट जनरल जे.एस संधू यांच्या माहितीनुसार, पोलीस लाईनमध्ये असणाऱ्या सगळ्या कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे. 

भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्तजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे. यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिर