जम्मू-काश्मिरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

By Admin | Updated: September 19, 2015 04:49 IST2015-09-19T04:49:02+5:302015-09-19T04:49:02+5:30

उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.

Five terrorists killed in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मिरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.
संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एन. एन. जोशी यांनी सांगितले, की गुरुवारी मध्यरात्रीनंतर नियंत्रण रेषेवर तैनात सतर्क सुरक्षा दलाने सीमेपलीकडून खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न करीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. रात्रभर चाललेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडील चार एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Web Title: Five terrorists killed in Jammu and Kashmir