नवी दिल्लीः दिल्लीत पुन्हा एकदा इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. जाकीर नगरमध्ये एका इमारतीला आग लागली असून, या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण गंभीररीत्या जखमी आहेत. दक्षिण दिल्लीच्या जाकीर नगर परिसरातील एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. आगीत जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्लीतल्या इमारतीला लागली भीषण आग, 6 जणांचा मृत्यू, 11 गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 08:39 IST