शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेनं पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 21:18 IST

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शीतलहरी पसरल्या आहेत. या कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. थंड वा-यांमुळे तापमान कमी होत असून, लोकांना सर्दी-ताप सारख्या आजारांनी ग्रासले आहेत. गेल्या 24 तासांत बदायूमध्ये थंडी वाजून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर आझमगडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशमधल्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात तापमान खालावत चाललं आहे. बरेली, गोरखपूर, मुरादाबादेत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे. या भागात पुढील दोन ते तीन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. उत्तर प्रदेशमधल्या शीत लहरींमुळे शाळा 7 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर 8 जानेवारीला सकाळी 10 वाजता शाळा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातही जोरदार थंडीची लाट पसरली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. मुंबईकरांनाही सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रविवारी निच्चांकी तापमान गोदाकाठी नाशिकला ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.गेले काही दिवस थंडी, उकाडा, ढगाळ हवामान असा सर्व ऋतुचा अनुभव एकाच दिवसात मिळाल्यानंतर, आता थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात विदर्भातील बहुतांश ठिकाणचे किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला असून, खान्देशही चांगलाच गारठला आहे. नाशिकच्या किमान तपमानातही पुन्हा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली असून, पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. पुणे शहरातील किमान तापमानही घटते आहे. शनिवारी या हंगामातील १०़१ इतके किमान तापमान होते. त्यात रविवारी किंचित वाढ होऊन ते १०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नववर्षांच्या सेलिब्रेशनला गुलाबी थंडीची साथ मिळणार आहे.काश्मीर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि कच्छ या भागात थंडीची लाट जाणवत आहे. काश्मीर खो-यात श्रीनगरमध्ये उणे २.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले. पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथे दाट धुक्यामुळे दृश्यमानता २५ मीटरपर्यंत कमी झाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश