जैश आणि हिज्बुलच्या पाच अतिरेक्यांना कंठस्नान काश्मिरात अनेक तास चालली चकमक
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:56+5:302015-01-15T22:32:56+5:30
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़

जैश आणि हिज्बुलच्या पाच अतिरेक्यांना कंठस्नान काश्मिरात अनेक तास चालली चकमक
श रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़काही अतिरेकी दडून बसल्याची गुप्त सूचना सुरक्षा दलाला मिळाली होती़ त्या आधारे गुरुवारी सकाळी येथून ६० कि. मी. अंतरावर शोपिया येथील केल्लर पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त शोधमोहीम आरंभली होती़ याचदरम्यान अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा दलांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले़ यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी चकमक उडली़ यात पाच अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ त्यांच्याकडून तीन एके रायफल्स, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त केला़ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्याचे कार्य सुरू आहे़ बुधवारीही सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात सहा तासांच्या चकमकीनंतर लष्कर ए तोयबाच्या एका म्होरक्यास ठार केले होते़