शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाच किमी प्रवास फक्त एका रुपयात; मोदीप्रेमी रिक्षावाल्याची खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 13:26 IST

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रवाशांकडून पाच किमी प्रवासासाठी केवळ 1 रुपया भाडे आकारण्याची भन्नाट ऑफर एक मोदी प्रेमी रिक्षावाल्याने दिली आहे.

उडुपी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त देशभरात विविधा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यान कर्नाटकमधील कुंदापूर उडुपी येथे राहणाऱ्या सतीश प्रभू यांनी मोदी सरकारचा चौथा वाढदिवस वेगळ्या अंदाजात साजरा केला.  पेशाने रिक्षाचालक असलेल्या सतीश प्रभू यांनी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रवाशांकडून पाच किमी प्रवासासाठी केवळ 1 रुपया भाडे आकारले. मोदींचे चाहते असलेले प्रभू या ऑफरबाबत विचारले असता म्हणाले की, मी गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवतोय. तसेच मी स्वस्तात प्रवासाची सुविधा दिल्याची ही पहिलीच वेळ नाही.  नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनून एक वर्ष पूर्ण झाले होते तेव्हापासून अशी ऑफर देण्यास मी सुरुवात केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी अशी ऑफर देत आहे आणि  मोदींच्या कारकिर्दीस पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मी अशी ऑफर देत राहीन." सतीश यांनी मोदींच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा  दोन दिवस प्रवाशांना स्वस्तात सेवा दिली होती. पुढे मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर तीन दिवस आणि तीन वर्षे पूर्ण झाल्यावर चार दिवस सतीश यांनी एक रुपयात सेवा दिली होती. यावर्षी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याने पाच दिवस स्वस्तात सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. 

सतीश सांगतात, ते मोदींचे मोठे चाहते आहेत.  पण मोदींसाठी फार काही करण्याइतपत आपली योग्यता नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या रिक्षामध्ये एक बॉक्स लावला असून, प्रवाशांना त्या बॉक्समध्ये काही नाणी टाकण्याची विनंती ते करतात. ही एकत्र केलेली नाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना भेट देण्याची त्यांची इच्छा आहे. पुढच्या वेळी जेव्हा मोदी उडुपी येथे येतील तेव्हा त्यांना भेटण्यास सतीश प्रभू इच्छुक आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटक