शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात सात जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 00:49 IST

छत्तीसगडमध्ये जंगलात भूसुरुंगाने वाहन उडवले; प्रचंड क्षमतेच्या स्फोटकांचा वापर

दंतेवाडा: छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलांचा भाग असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगचा स्फोट घडवून सशस्त्र दलाचे वाहन उडवून लावले. त्यात सशस्त्र दलाचे पाच जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे दोघे असे सात जण शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. जवानांच्या जीपलाच नक्षलवाद्यांनी टार्गेट केल्याने त्यातून वाचणे त्यांना शक्य झाले नाही.दंतेवाडा जिल्ह्यातील छोलनार आणि किरंडूल गावांच्या परिसरात पोलीस व सशस्त्र दलाचे जवान एकत्रपणे नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना, हा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यासाठी प्रचंड क्षमतेची स्फोटके वापरण्यात आली होती. त्यामुळे जीपमधील सातपैकी पाच जण जागीच मरण पावले, तर आणखी दोन जवानांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवले होते. त्यांनी शस्त्रेही पळवून नेलीजवानांचे वाहन या स्फोटात पार जळून खाक झाले. या स्फोटांत जवान मरण पावल्यानंतर त्यांच्याकडील सर्व शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळवली.जवानांकडील चार इन्सास रायफली व एक एके-४७ रायफल ही शस्त्रे गायब झाल्याचे पोलिसांनी मान्य केले.