वेगवेगळ्या अपघातात पाच जखमी
By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:27+5:302016-02-08T22:55:27+5:30
जळगाव : जिल्ात ठिकठिकाणी झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.

वेगवेगळ्या अपघातात पाच जखमी
ज गाव : जिल्ात ठिकठिकाणी झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे. एरंडोल येथून जळगावकडे दुचाकीने येणार्या बाबुलाल सखाराम पवार (६५) व मनोहर बाबुलाल पवार (३८), दोघे रा. सावदा, ता. एरंडोल यांच्या दुचाकीला समोरुन येणार्या दुचाकीने धडक दिली. त्यात हे पिता-पुत्र जखमी झाले तर समोरुन येणारा दुचाकीस्वार फरार झाला. चोपडा तालुक्यातील आनोरदा येथील सुनील प्रताप बारेला (२५) हा बैलगाडीतून जात असताना त्याला दुचाकीने धडक दिल्याने तो जखमी झाला. चोपडा तालुक्यातीलच धानोरा येथील गजानन पोपट महाजन (३५) हेदेखील दुचाकीचा अपघात होऊन जखमी झाले. रावेर तालुक्यातील सुरवाडी येथील महेंद्र प्रभाकर हिरोळे (३०) या दुचाकीस्वाराला टेम्पोने धडक दिल्याने तो जखमी झाला. या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.