शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पाचशेच्या दोन प्रकारच्या नोटा सरकारने छापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:40 AM

देशात ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा छापल्या जात आहेत. एक सत्ताधारी भाजपला निवडणुकांमधे वापरण्यासाठी तर दुसऱ्या देशातल्या जनतेसाठी. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला, त्याचे सत्य आज आम्हाला कळाले आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली :देशात ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा छापल्या जात आहेत. एक सत्ताधारी भाजपला निवडणुकांमधे वापरण्यासाठी तर दुसºया देशातल्या जनतेसाठी. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय का घेतला, त्याचे सत्य आज आम्हाला कळाले आहे. असा आरोप काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात हरकतीचा मुद्द्याद्वारे केला आणि दोन प्रकारच्या नोटांची रंगीत फोटाकॉपी सभागृहात फडकावली.सभागृहाचे नेते अर्थमंत्री अरूण जेटलींनी हा शून्य प्रहराचा दुरूपयोग आहे. कुठले तरी कागद हवेत फडकावत सभागृहात हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्याची कायद्यात तरतूद नाही असे सांगत सिब्बल यांच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला. मात्र काँग्रेससह बहुतांश विरोधकांनी दोन प्रकारच्या नोटांवर गंभीर आक्षेप नोंदवला. सिब्बल यांच्या आरोपांना दुजोरा देत जद(यु)चे शरद यादव, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन यांनीही जाब विचारला. काँग्रेस सदस्यांचा मुख्य आरोप होता की ५00 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटांची छपाई हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आनंद शर्मा म्हणाले की, चलनव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले, दोन प्रकारच्या नोटा हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही. चर्चा हवी असल्यास त्यांनी रितसर नोटीस द्यावी. उपसभापतींच्या निर्णयाशी असहमत होत घोषणा देत विरोधक आसनासमोर आले. या गदारोळात शून्य प्रहरात दोनदा व प्रश्नोत्तराच्या तासात तीनदा कामकाज तहकूब झाले.आक्षेपांचे उत्तर नाहीचविरोधकांच्या आरोपांचे खंडन करीत काहीशा संतापलेल्या स्वरात जेटली म्हणाले की, विरोधक नेहमीच नोटीस न देता बिनमहत्त्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित करतात. शून्य प्रहराचा हा सरळ सरळ दुरूपयोग आहे. मात्र, नोटांविषयीच्या विरोधकांच्या आक्षेपांबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.