बेळगावजवळ विचित्र अपघातात पाच ठार
By Admin | Updated: April 25, 2016 00:43 IST2016-04-25T00:43:40+5:302016-04-25T00:43:40+5:30
२१ जखमी : रुग्णवाहिकेने दिली ता वाहनांना धडक

बेळगावजवळ विचित्र अपघातात पाच ठार
२ जखमी : रुग्णवाहिकेने दिली ता वाहनांना धडकबेळगाव : मेकालमर्डी क्रॉस येथे झालेल्या खासगी रुग्णवाहिका, ट्रक, मिनी ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात पाचजण ठार, तर एकवीसहून अधिक जण जखमी झाले. बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी हा अपघात घडला.मृतांपैकी चौघे जण रुग्णवाहिकेमधून एका रुग्णाला बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात होते. काळव्वा बसनिंगप्पा गुगरी (४५), बसव्वा बसप्पा गुगरी (५०), नागेश राचप्पा कोळगी (४०) व महादेव न्यामगौडर (४०, रुग्णवाहिका चालक) अशी त्यांची नावे आहेत. अन्य मृताचे नाव अरुण शिवाजी पवार असे असून, तो दुचाकीवरून जात होता. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाला.खासगी रुग्णवाहिकेमधून काळव्वा हिला उपचारासाठी कोळूर गावाहून बेळगावला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत होते. रुग्णवाहिका चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनी ट्रकला धडक दिली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून नंतर दुचाकीवर रुग्णवाहिका आदळली. त्यामुळे हा विचित्र अपघात घडल्याचे मिनी ट्रकचालकाने सांगितले. (प्रतिनिधी)