पाच बालकांनी युवकाला भोसकले

By Admin | Updated: August 8, 2014 01:08 IST2014-08-08T01:08:59+5:302014-08-08T01:08:59+5:30

बाल न्याय कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असताना दुस:याच दिवशी पाच अल्पवयीन मुलांनी एका 19 वर्षीय युवकाला भोसकून ठार मारल्याच्या घटनेने दिल्ली हादरली आहे.

Five children have thrown the child | पाच बालकांनी युवकाला भोसकले

पाच बालकांनी युवकाला भोसकले

>नवी दिल्ली : बाल न्याय कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असताना दुस:याच दिवशी पाच अल्पवयीन मुलांनी एका 19 वर्षीय युवकाला भोसकून ठार मारल्याच्या घटनेने दिल्ली हादरली आहे. 
दक्षिण दिल्लीच्या भर बाजारातील हा थरार सीसीटीव्ही कॅमे:यात बंद झाला. बाल गुन्हेगारांमधील क्रौर्य हा गंभीर चिंतेचा मुद्दा असल्याचे या निमित्ताने उघड झाले.
मदनगीर सेंट्रल मार्केटमध्ये पाच मुले सचिन नावाच्या 19 वर्षीय युवकाचा चाकू आणि पिस्तुले घेऊन पाठलाग करीत आहेत. सचिन आणि त्याचा 17 वर्षीय मित्र बाईकवर जात असताना ही मुले सचिनला ओढतात. चाकूचे असंख्य घाव घालतात. 
त्यानंतर त्याला एका अरुंद गल्लीत नेतात. हे दृश्य एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाले. 
सचिनच्या अंगावर 15 घाव दिसून आले. पाचही हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी म्हटले. मृत युवकाच्या मित्रंनी दिलेली माहिती आणि सदर फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या सर्वाची ओळख पटवली आहे. सचिनचा मित्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Five children have thrown the child