लूटमार करणार्या तिघांकडून दुचाकी जप्त पाच गुन्हे दाखल: २५ हजारांची रोकडही केली हस्तगत
By Admin | Updated: September 18, 2016 22:35 IST2016-09-18T22:35:17+5:302016-09-18T22:35:17+5:30
जळगाव: बॅँकांच्या बाहेर थांबून सावज हेरुन त्यांना लुटणार्या तिघं चोरट्यांकडून दोन दुचाकी व २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अमळनेर येथे तीन तर पाचोरा येथे दोन असे पाच जबरी चोरीचे गुन्हे तिघांवर दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे.

लूटमार करणार्या तिघांकडून दुचाकी जप्त पाच गुन्हे दाखल: २५ हजारांची रोकडही केली हस्तगत
ज गाव: बॅँकांच्या बाहेर थांबून सावज हेरुन त्यांना लुटणार्या तिघं चोरट्यांकडून दोन दुचाकी व २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अमळनेर येथे तीन तर पाचोरा येथे दोन असे पाच जबरी चोरीचे गुन्हे तिघांवर दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांच्या पथकाने अमन शांताराम बारोटे (वय २२ रा.मेहरुण, जळगाव), प्रशांत सुरेश माळी (वय २१. रा.सत्यम पार्क, जळगाव) व राम प्रकाश तमाईचेकर (वय ३० रा. जाखनी नगर, जळगाव) या तिघांना दोन दिवसापूर्वी ताब्यात घेतले. या तिघांनी ३ मार्च २०१६ रोजी पाचोरा शहरातील शिवाजी पुतळ्या जवळून दुचाकीच्या डिक्कीतून ४० हजार रुपये लांबविले होते. या गुन्ात वापरण्यात आलेली दुचाकी(क्र.एम.एच.१९ सी.डी.६५३४ व एम.एच.१९ सी.जी.१०८६)) पोलिसांनी हस्तगत केली आहे. पाचोरा, जळगाव व अमळनेरच्या गुन्ात या त्रिकुटाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने त्यांचा जळगाव, अमळनेर, पाचोरा व नंदुरबार येथे शोध घेतला असता अमळनेरला पहिला आरोपी सापडला. त्यानंतर दोघं जाळ्यात अडकले.