शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात कामासाठी शरीरसुखाची मागणी; न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नवीन कायद्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:42 IST

सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला.

- डॉ. खुशालचंद बाहेती 

तिरुवनंतपूरम : मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांना लैंगिक मागणी, लैंगिक छळ आणि मारहाणीचा सामना करावा लागतो. हे नवीन कायदा व स्वतंत्र न्यायाधिकरणाद्वारे सोडवले जाऊ शकते, असे न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नमूद केले आहे. २०१७ मध्ये केरळ सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. तो आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.

असे छळले जातेय... शरीरसुखाची मागणी, लैंगिक छळ., कामाच्या ठिकाणी गैरवर्तन आणि हल्ला, वाहतूक आणि निवास व्यवस्थेचा अभाव, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नसणे, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, पुरुषांचे वर्चस्व, दारू आणि ड्रग घेऊन इतरांकडून असभ्य आचरण, लैंगिक टिपण्या, सायबर छळ, मानधनात असमानता.

समितीने काय केल्या शिफारशी? - स्वतंत्र केरळ सिने नियोक्ते आणि कर्मचारी (नियमन) कायदा लागू करा. - न्यायाधिकरण स्थापन करा. - न्यायाधिकरणासमोरील कार्यवाही गोपनीय आणि कॅमेरामध्ये होईल. - लैंगिक जागृतीसाठी अनिवार्य, मूलभूत ऑनलाइन प्रशिक्षण. - शूटिंग ठिकाणी दारू, ड्रग्जवर बंदी. - मोबदल्यातील तफावत कमी करा. - कनिष्ठ कलाकारांसाठी किमान मानधन निश्चित करावे.- महिलांसाठी योग्य निवासाची सोय. - लैंगिक समानतेवर भर देणारे चित्रपट धोरण. - फी सवलतीसह महाविद्यालयांमध्ये ऐच्छिक अभ्यासक्रम म्हणून चित्रपटसृष्टीचा अभ्यास. - महिलांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म. जेथे घटना सामायिक करू शकतात आणि समर्थन देऊ शकतात. - महिलांवरील हिंसा दर्शविणाऱ्या चित्रपटातील दृश्यांचा गौरव नको.

चित्रपटसृष्टीतील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) स्थापन करून समस्या सोडवता येणार नाहीत. कारण, सिनेमात काम करणाऱ्या व्यक्तीच आयसीसीचे अध्यक्ष आणि सदस्य असतील. त्यांच्या समस्या आयपीसी आणि लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याद्वारे हाताळल्या जाऊ शकत नाहीत. - के. हेमा, न्यायमूर्ती.

टॅग्स :Courtन्यायालयTollywoodTollywood